मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

Informed Decision - माहिती उपलब्ध करून घेतलेला निर्णय



व्यावसायिक जीवनातील हल्ली नव्याने आवडलेला शब्द म्हणजे 'Informed Decision'. प्रथम ज्यावेळी हा शब्द ऐकला तेव्हा आपल्या टीमला असा निर्णय घेण्यात सक्षम करण्यात व्यवस्थापकाने कशी महत्त्वाची भूमिका बजाविली पाहिजे असा चर्चेचा रोख होता. नेहमीप्रमाणे माझी गाडी आपल्या वैयक्तिक जीवनाकडे वळली. ह्यातील विविध टप्पे असे असावेत. १> सर्वप्रथम मी मला 'Informed Decision' घ्यायचा आहे की नाही ह्याचा निर्णय घेतो. Informed Decision म्हणजे मेंदूचा सहभाग आला. पण माझ्या प्रत्येक निर्णयात मला मेंदू सहभागी करून घ्यायचा आहे की नाही हा माझा निर्णय! मी आर्थिक गुंतवणूक करतो त्यातील काही भाग माझ्या मित्रांच्या कंपन्यात करतो कारण तिथे मला माझी मैत्री महत्वाची असते. लग्न करताना काही लोक Informed Decision घेतात तर काही हृदयाचे म्हणणे ऐकून! २> एकदा का मी 'Informed Decision' घेण्याचा निर्णय घेतला की मी माहितीचे योग्य स्त्रोत माहित करून घेणे अत्यावश्यक बनते. हल्ली माहितीचे खूप स्त्रोत उपलब्ध असल्याने मला त्यातील योग्य स्त्रोत निवडणे आवश्यक असते. मग मी गरज पडल्यास जाणकारांचा सल्ला घेणे आवश्यक असते. ३> समजा मी सुदैवी असेन आणि मला योग्य जाणकार भेटला आणि त्याने मला विविध पर्याय सुचविले. आतापर्यंत आपणास जाणविले असेल की लेखाचा एकंदरीत रोख आर्थिक गुंतवणुकीकडे किंवा नोकरी धंद्यातील एखाद्या निर्णयाकडे आहे. आता जाणकाराने सुचविलेल्या पर्यायांचे दोन गुणधर्म असतात. पहिला म्हणजे त्यातील फायद्याचे प्रमाण आणि दुसरा म्हणजे त्या पर्यायाची खात्रीलायकता! मग मी माझ्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार उपलब्ध पर्यायांच्या ह्या दोन्ही गुणधर्मांचे मुल्यमापन करून त्यातील मला योग्य वाटणारा निर्णय घेतो. बघा पुढच्या वेळी कोणता निर्णय घेताना तो 'Informed Decision' आहे की नाही!  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...