मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

परीक्षामय



नाही, नाही! शीर्षक वाचून आमच्याकडे कोणी दहावीच्या परीक्षेला बसले आहे असा समज बिलकुल करून घेवू नका. सोहमची सीबीएसई बोर्डाची इयत्ता चौथीची परीक्षा सुरु होतेय आज! आणि आम्ही सर्वजण त्याच्या तयारीत गुंतलो आहोत. विषयाची यादी ह्याप्रमाणे
मुख्य विषय
इंग्लिश
हिंदी
गणित
विज्ञान
सामाजिक शास्त्र
संगणक

छोटे विषय
मराठी
जनरल नॉलेज
मुल्य शिक्षण (Value Education)


एकूण वर्ष तीन सत्रात विभागलेले असते. ह्या तीन सत्रात सुद्धा प्रत्येकी दोन परीक्षा असतात. पहिली संगणकाधारित  - वस्तुनिष्ठ प्रश्नांची! आणि दुसरी मुख्य परीक्षा! एक सत्र कसेबसे तीन महिन्याचे, त्यात ह्या दोन परीक्षा! मुख्य परीक्षेच्या आधी एक आठवडा त्याची सराव परीक्षा आणि प्रोजेक्ट! एकंदरीत, दर महिन्यात परीक्षेचा हाहाःकार! एक मात्र बरे, नवीन पिढीतील सोहम आणि त्याची मित्रमंडळी ह्या परीक्षा प्रकाराविषयी जास्त काही दडपण घेत नाहीत. सोहमला परीक्षेचे दडपण येत नाही ह्याचे पूर्वी मला दडपण येत असे ! पण हल्ली मला कळून चुकले की मनुष्यजात उत्क्रांतीचे नवनवीन टप्पे गाठत आहे त्यामुळे बहुदा  हल्लीच्या युगात वावरण्यासाठी योग्य अशी दडपण घेणारी पिढी आता निर्माण झाली असावी!


दहावी बारावीच्या परीक्षाही सध्या सुरु आहेत. आम्ही ८८ - ९० साली दहावी बारावी दिली तेव्हा मामला सोपा होता. दहावीच्या परीक्षेचे सर्व पेपर रविवारची सुट्टी वगळता सलग असायचे. त्यामुळे शैथिल्य वगैरे यायचं नाही. सर्वांना एकाच प्रश्नपत्रिकेचा सामना करायला लागायचा. गेल्या काही वर्षात दहावी बारावीच्या परीक्षेच्या स्वरुपात आमुलाग्र बदल झालेला दिसतोय.
दहावीच्या परीक्षेतील गुणवत्ता यादी पद्धत आपण काढून टाकली. का तर? शालेय मुलांना इतक्या वयात गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्याचे दडपण येऊ नये. ह्या मुद्द्यावर माझं वेगळं मत आहे. आपण अजूनही गुणवत्ता यादी ठेवावयास हवी होती. असो, एस. एस. सी. बोर्डाचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा मुद्दा नाही म्हटलं तरी गौण बनत चालला आहे. तसेच दहावीच्या परीक्षेत वाढलेले टक्क्यांचे प्रमाण!  हे प्रमाण इतके वाढले ही पूर्वी ९० टक्क्यांचे जे अप्रूप होते ते आता पूर्णपणे नाहीसे झाले आहे.
आता वळूयात अभियांत्रिकी पदवीसाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षांविषयी.  हल्ली नक्की कोणती पद्धत अवलंबली जाते ह्याविषयी माझा बराच गोंधळ आहे. माझ्या सध्याच्या ज्ञानानुसार प्रथम बारावीतील भौतिक, रसायन आणि गणित ह्या विषयातील गुण आणि त्याचबरोबर IIT च्या MAINS ह्या परीक्षेतील गुण लक्षात घेतले जातील. आता हा सध्या नवीन आलेला बदल असावा. बारावीची परीक्षा मार्च महिन्यात तर IIT MAINS एप्रिल - मे महिन्यात! इतका काळ सतत परीक्षेचे दडपण मुलांना घ्यायला लावणे हे कितपत योग्य आहे? आणि सर्वच मुलांनी हे दडपण इतका काळ घेण्याची गरज आहे काय?
ज्यांना खरोखर IIT ला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी IIT प्रथम MAINS मध्ये चांगले गुण मिळवावेत आणि IIT ADVANCED ला पात्र व्हावे. आता साध्या अभियांत्रिकी पदवीच्या परीक्षेला सुद्धा IIT ची मिती समाविष्ट केल्याने आता मामला क्लिष्ट बनला आहे. त्यामुळे असे काही संयुक्त (Integrated) शिकवणी वर्ग निघाले आहेत जे मुलांची बारावी आणि IIT ह्या दोघांसाठी एकदम तयारी करून घेतात. आता त्यांचे लक्ष असते ते IIT ADVANCED साठी मुलांची तयारी करून घेणे. परंतु ह्यात प्रवेश घेणारे काहीजण केवळ बारावी आणि IIT MAINS ह्या पहिल्या भागासाठीच उत्सुक असतात. परंतु त्यांना  नाहक संपूर्ण क्लिष्ट भागाचे दडपण घ्यावे लागते. आणि नक्कीच  IIT ADVANCED चे नुसते दडपण घेणे हे सुद्धा येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे! आता हा इतका सर्व अभ्यासक्रम  शिकवायचा असल्याने हे शिकवणी वर्ग मुलांची दहावी परीक्षा संपली की सुरु होतात. माझ्या माहितीतला एक शिकवणी वर्ग एकदा अकरावी सुरु झाली की अगदी रविवारीची सुद्धा सुट्टी देत नाही. सतत परीक्षा सुरूच राहतात. मुलांच्या उपस्थितीचा रिपोर्ट तत्काळ पालकांना जातो. सर्व मुलांना हे कितपत झेपते हा महत्वाचा मुद्दा! बाकी ह्यांचा दर्जा तसा चांगला! शिकवायला सर्व IIT मधून  पदवी घेतलेला शिक्षकवर्ग! आणि शंकानिरसन करण्यासाठी नियमितपणे खास सत्र!
ह्यात खटकण्याजोग्या काही गोष्टी! एखाद्या शिक्षकाची शिकविण्याची पद्धत जर मुलांना आवडली नाही तर लगेच ते त्याविषयी तक्रार करून शिक्षकवर्ग बदलून घेऊ शकतात. शिक्षकांना किती पॅकेज मिळते हे मुलांना माहित असते. एकंदरीत आपण एक ग्राहक आणि शिक्षकवर्ग हा आपल्याला सेवा पुरविणारा असा अयोग्य समज मुलांनी करून घेतलेला दिसतो.
अपरिहार्यपणे २५ वर्षापूर्वीची बारावीतील मुलांची (आमची) मानसिकता आणि हल्लीच्या मुलांची मानसिकता ह्याची तुलना मनातल्या मनात होते. त्यावेळी बारावीत सुद्धा शिक्षकांविषयी बराच आदर असायचाकॉलेजात, शिकवणी वर्गात चांगलं इंग्लिश बोललं जायचं. WHATSAPP च्या भाषेने सर्वत्र धुमाकूळ घातला नव्हता. आता मुलांमध्ये स्वतःच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास ओसंडून वाहतोय. मला यश मिळाले नाही तर ते केवळ मी मेहनत केली नाही म्हणून असाच समज बऱ्यापैकी पसरलेला आहे.
एकंदरीत आपल्याकडील हा फरक माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अजून काही वर्षे तेजीत राहणार ह्या गृहितकावर आधारित आहे असे माझे मत! परंतु ह्या क्षेत्रातील बाहेरचे चित्र काहीसे बदलते आहे! हे क्षेत्र पूर्वीइतके आकर्षक राहिले नाही. आणि बरेच अभियंते ह्या क्षेत्रात गेल्याने स्थापत्य, विद्युत आणि मेकॅनिकल (यांत्रिकी?) ह्या पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये दर्जेदार अभियंत्यांची चणचण भासत आहे! आपण बारावीनंतर ह्या क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी वेगळा प्रवेशमार्ग आखू शकतो का?
कोणत्याही यशस्वी कंपनीत बहुदा 'यशासाठी लागणाऱ्या गोष्टीची योग्य प्रकारे व्याख्या करून त्यासाठीचा मार्ग आखून ठेवला जातो'. ह्या तत्वाला 'Keep the things simple' असे म्हटले जाते. आपल्याकडे असा कोणी शिक्षणतज्ञ  आहे काय जो शिक्षणक्षेत्रात ह्या तत्वाची अंमलबजावणी करू शकेल?
होळीच्या सर्वांना शुभेच्छा!

आता आपण सोहमच्या अभ्यासक्रमाकडे पाहूयात! एक लक्षात ठेवा हा तिसऱ्या सत्रातील दुसऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे! म्हणजे एकंदरीत वर्षाचा एक सष्टांश (/) भाग!


इंग्लिश -
मुख्य पुस्तक
The Wonderful Tea Kettle
The Violet
A Man's Club
A Wolf's Cub


ह्यातील वानगीदाखल एक प्रश्नोत्तर!
Describe the badger's performance.
Answer - The tinker dressed up in colorful clothes, with a big fan in his hand, came out on the platform. He made a polite bow and set the wonderful tea-kettle on the stage. At the wave of his fan, the kettle ran around on four legs, half badger and half kettle, clanking its lid and wagging its tail. How the children shouted! Next it turned into a badger, swelled out its body and beat a tune on it like a drum. It danced on the tight rope and walked the slack rope, holding a fan or an umbrella in its paw, stood on its head, and finally at a flourish of its master's fan became a cold brass tea-kettle again.


व्याकरण -
Verb Like Adjective
The Merchant of Seri
Homophones and Irregular Verbs
Uses of Simple Present Tense
auxiliary will


व्याकरण -
Prepositions
conjunctions
Proverbs
Comprehension C
Writing Skills - Formal Letter, Messages


हिंदी (शुद्धलेखन चूकभूल द्यावी घ्यावी!)
चतुर चरवाहा
डरना कभी जाना
कौन जीता
बुद्धिमान बगुला
बाँकी बाँकी धुप
पिटारे में कुछ और!


अधिक व्याकरण


गणित
काळ (Time)
Money


विज्ञान
Force, Work and Energy
Air, Water and Weather
Our Environment


एक उदाहरण
Write a note on radioactive pollution
Radiation is an invisible pollutant that can be highly dangerous. Some radiation reaches the earth from the sun and outer space. Larger amounts come from radioactive materials like fallout from nuclear weapons and waste material from nuclear power plants and other electronic devices. Exposure to large amounts of radiation causes cancer in human.


सामाजिक शास्त्र
Soils of India
Our Water Resources
Our Mineral Resources
They showed us the way!


आता मध्यप्रदेशात एखाद्या ठिकाणी बॉक्साईट (चूकभूल द्यावी घ्यावी) मिळत असेल ते लक्षात ठेवायचे आणि पुन्हा ते ठिकाण नकाशात नक्की कोठे आहे हे ही दाखवायचं हे महात्काठीन काम ह्या बिचाऱ्या मुलांना करावं लागतं!




संगणक
 Kid Pix -
ह्या सॉफ्टवेयर संबंधित प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरे!
आता हे सॉफ्टवेयर ही मुले आरामात वापरू शकतात परंतु त्यावर प्रश्नोत्तरांचा पेपर आवश्यक का आहे हे मला कोणी समजवून सांगेल काय? जसे की टास्कबार वर कोणते आयकॉन आहेत हे मुलांनी का बरे लक्षात ठेवावे?


छोटे विषय
मराठी
पावसाची मजा
फळांची मेजवानी
आवडता खेळ
मराठी वर्णमाला
माझे घर


जनरल नॉलेज (GK)
एका पानाचे १८ धडे ह्यात प्रत्येक राज्याच्या नृत्य, इंग्लिश साहित्यातील इतिहासते भगतसिंग ह्या चित्रपटात त्यांची भूमिका कोणी (अजय देवगण) ह्याने साकारली. असे प्रत्येकी - प्रश्न!


मुल्य शिक्षण (Value Education)
प्रत्येक मूल्य उदाहरणासकट समजवून देणारा एक धडा आणि त्यावरील प्रश्नोत्तरे!




सारांश


कोठेतरी काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकतेय! मागची पिढी मराठी माध्यमातून वरील उल्लेखलेल्या अभ्यासक्रमापेक्षा बराच कमी अभ्यास करून बाहेर पडली.  आणि बऱ्यापैकी टिकली. ह्या पिढीला प्रश्न उदभवतो तो अगदी उच्चपदाच्या नजीक आल्यावर ती शेवटची पायरी ओलांडायला! परंतु त्यावर हा असा उपाय नक्कीच नाही! सतत परीक्षांचा मारा ह्या वयातील मुलांवर करणे किती योग्य आहे? आमचे तत्व आहे की शिकवणी लावायची नाही त्यामुळे अजूनही आम्ही धडपडत त्याचा अभ्यास घेतो! त्याची काही उत्तरे त्याला बरे वाटावे म्हणून आम्हीही पाठ करतो!
सत्य एकच आहे! आपण व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धतीची निर्मिती करण्यात सपशेल अयशस्वी ठरलो आहोत. त्यावर उपाय म्हणून आपण दहावीपर्यंत मुलांना सर्व शाखांसाठी तयार करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पालकांना एकच सल्ला - स्वतःला त्या मुलांच्या जागी ठेवून पहा! एखादा विषय, त्यातील प्रश्नोत्तरे स्वतःला पाठ करता येतील कि नाही हे स्वतःला विचारून पहा. उत्तर जर नाही असेल तर मुलावर त्याची सक्ती करू नका! शेवटी तो तुमचा मुलगा / मुलगी आहे! परवाच सराव परीक्षेला सोहमला नकाशावरील प्रश्न - खनिजे आढळणाऱ्या ठिकाणाचे नकाशातील स्थान दाखवा हा गुणांचा प्रश्न होता. गुगलच्या युगात हे पाठ करण्याची गरज नाही हे आमचे मत त्यामुळे त्याला ह्या प्रश्नांचे दडपण घेण्याचा सल्ला आम्ही दिला!


असो परीक्षा आज सुरु झालीयं! आम्हांला आणि सोहमसोबत त्याच्या सर्व मित्रमंडळी, त्यांच्या पालकांना तुमच्या शुभेच्छांची गरज आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...