मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

क्षणभंगुर ते शाश्वत


१९९९ सालची गोष्ट. बऱ्याचशा Y2K प्रोजेक्टची कामे भारतीय कंपन्यांनी आटोक्यात आणली होती. Y2K प्रोजेक्टच्या निमित्ताने पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवीधरांनी संगणक क्षेत्रात प्रवेश केला होता. Y2K प्रोजेक्ट मुख्यत्वे करून मेनफ्रेम क्षेत्रातील होते. आणि ह्या प्रोजेक्टद्वारे आज्ञावलीत केले गेलेले बदल अगदी प्राथमिक स्वरूपाचे होते. त्यामुळे जसजसे हे प्रोजेक्ट समाप्तीला येवू लागले तसतसे ह्या पदवीधरांच्या मनात असुरक्षिततेची भावना मूळ धरू लागली. ही प्रोजेक्ट संपल्यावर आपले काय होणार? हे भय मनात मूळ धरू लागले. आधीच आपण आपले मूळ क्षेत्र सोडले आहे आणि आता ह्या नवीन क्षेत्रात सुद्धा आपण तुलनात्मकदृष्ट्या जुन्या तंत्रज्ञानावर काम करत आहोत, त्यामुळे आपल्याला नवीन संगणकीय भाषा शिकली पाहिजे ह्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले.
मागे वळून पाहता १९९९ साली ज्यांनी जावा सारख्या भाषा शिकून स्वतःला विकसित करून घेतले त्यांचेही भले झाले आणि ज्यांनी कोबोलवर काम करत राहणे पसंत केले त्यांचेही भले झाले. फरक इतकाच की जावा शिकलेल्यांना सतत काळानुसार येणाऱ्या नवीन तंत्राशी स्वतःला विकसित करीत ठेवावे लागले ह्याउलट मेनफ्रेम मध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांना थोड्या कमी प्रमाणात हे श्रम घ्यावे लागले. हे वाचलेले श्रम मेनफ्रेम व्यावसायिकांनी त्या विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान (domain knowledge) संपादन करण्यात गुंतविले
मेनफ्रेमच्या बाजूला काही मोठी अनुकूल बाबी आहेत. काही दशकांतील त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील गुंतागुंतीचे नियम ह्या आज्ञावलीत लिहिले गेले आहेत आणि मेनफ्रेमची डेटा पृथ्थकरण करण्याची क्षमता अफाट आहे . ह्या अनुकूल बाबींच्या जोरावर मेनफ्रेम इतकी दशके टिकून राहिली आणि पुढील काही दशके सुद्धा राहणार. ह्यात लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा! मेनफ्रेम काही अगदीच बदलली नाही असे नाही. नव्या युगातील ग्राहकांना जे भुरळ घालतात त्या नवीन युगातील आकर्षक GUI शी संवाद साधण्याची कला तिने साध्य केली. मेनफ्रेमची खासियत तिचा गाभा आणि त्यातील अफाट वेगाने महाकाय माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता! तिचा तिने पुरेपूर वापर करत आपले अस्तित्व टिकवून धरलय.
आज हे सर्व आठविण्याचे कारण काय तर रविवारी सायंकाळी लॉक झालेला IPAD परत सुरु करण्यासाठी केलेली आणि whatsapp बायकोच्या भ्रमणध्वनीवर कार्यरत करण्यासाठी केलेली धडपड.
असो आपल्या पारंपारिक संस्कृतीचे आणि आधुनिक संस्कृतीचे सुद्धा काहीसे असेच आहे ना! पारंपारिक संस्कृतीचा गाभा अगदी मुल्याधिष्ठित परंतु दर्शनी रूप मात्र काहीसे अनाकर्षक आणि कर्मठ! तो बहुमुल्य गाभा कायम ठेवून नव्या पिढीशी सुसंवाद साधणारा दुवा शोधणे आवश्यक आहे असे तुम्हाला सुद्धा नाही वाटत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...